आज रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो चा “चेरी ब्लॉसम प्रोजेक्ट” (Cherry Blossom Project) रेणुका स्वरूप शाळेत , फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. एकूण 307 विद्यार्थिनी लाभार्थी होत्या. प्रथम त्यांना हिमोग्लोबिनचे शरीरातील महत्त्व आणि त्याचं संतुलन टीकवण्याकरता दैनंदिन जीवनातलां आहार याबद्दल माहिती देण्यात आली.
त्यानंतर मुलींचा ब्लड ग्रुप , आणि हिमोग्लोबिन चेक झालं. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे नऊ जण आणि आपल्या क्लबच्या प्रेसिडेंट रो. अमिता, रो. अंजली , रो.मंजिरी आणि वंदना उपस्थित होतो. तीनशे सात मुलींपैकी 32 मुलींना हिमोग्लोबिन कमी आढळलं. ज्या मुलींना हिमोग्लोबिन कमी आहे त्यांना गोळ्या देण्यात आल्या. त्या मुलींचा परत चेकअप तीन महिन्यांनी घेतला जाईल.