Audio Diwali Ank for Blind Welfare Organization
Blind welfare organiztion ने निर्मिती केलेल्या “ब्रेल संस्कार भारती” या दिवाळी अंकाचं ध्वनिमुद्रित रूपांतरण आपण “यशोवाणी” संस्थेच्या सहाय्याने केलं आहे.
दिवाळी ही आपल्या सर्वांसाठी विविध प्रकारचा आनंद घेऊन येते. साहित्य हा त्यातला एक महत्त्वाचा घटक. दिवाळी अंकाशिवाय कुठल्याच मराठी घरातली दिवाळी पूर्ण होत नाही. समाजातील कुठलाच घटक या आनंदापासून वंचित राहू नये म्हणून Blind Welfare Organization या संस्थेने हा ब्रेल दिवाळी अंक काढला आहे. ही माहिती आपल्यापर्यंत PDG रश्मी कुलकर्णी यांच्यामुळे पोचली.
आपण यशोवाणी संस्थेच्या प्राची गुर्जर यांच्या कामाची माहिती यापूर्वी करून घेतली होती. Technology च्या साहाय्याने आपण कमीत कमी वेळात आणि खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत/ अंधांपर्यंत कसे पोचू शकतो हे त्या कार्यक्रमातून आपल्याला कळलं होतं.
ह्या ब्रेल अंकाचे ध्वनी रूपांतरण करण्याची कल्पना त्यामुळे आपले प्रोजेक्ट डिरेक्टर PP मकरंद फडके यांच्या मनात आली.
आपल्या क्लबमधील बऱ्याच लोकांनी ह्या कल्पनेला प्रतिसाद देऊन, त्यासाठी ध्वनिमुद्रण करायचीही तयारी दाखवली होती.
मात्र दिवाळीपूर्वी हे प्रकाशन होणं महत्त्वाचं होतं आणि हातात अतिशय कमी वेळ होता. यशोवाणीच्या trained volunteers नी चॅलेंज घेऊन युद्ध पातळीवर ह्या अंकाचं अतिशय सुश्राव्य असं ध्वनिमुद्रण आपल्याला करुन दिलं.
ह्या झूम मीटिंग मध्ये Blind Welfare Organization चे श्री अरुण भरस्कर आणि अंकाचे संपादक श्री रघुनाथ बरड उपस्थित होते. त्यांनी अत्यंत मुक्तकंठाने ह्या अंकाची आणि त्यामागील आपल्या प्रयत्नांची स्तुती केली. तसंच त्यांनी Blind Welfare Organization, नाशिक आणि आसपासच्या भागात कशा प्रकारे काम करते हे ही सांगितलं.
यशोवाणीच्या प्राची गुर्जर यांनी हे काम करण्यामागची त्यांची भूमिका आणि युद्धपातळीवर काम करण्याचा अनुभव याबद्दल सांगितलं.
यशोवाणी मधील त्यांचे सहकारी, नागपूर येथील अंधशाळेचे प्रतिनिधी श्री तायडे, काही metropolitans ह्या मिटींगला उपस्थित होते.
प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी यांनी ऑडिओ अंकाचं महत्त्व विशद केलं. जास्तीत जास्त लोकांना अंक मिळण्याबरोबरच ध्वनिमुद्रण ऐकताना आपल्याला शब्दातील भाव भावना जास्त चांगल्या प्रकारे कळतात, हा त्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे असं ते म्हणाले. केवळ अंध नव्हेत तर इतर डोळस व्यक्तींनी पण हा अंक ऐकायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं.
अंकाचं प्रकाशन करताना त्याच्या ध्वनिमुद्रणातील काही भाग उपस्थितांना ऐकवण्यात आला.
Project Director PP मकरंद यांनी ह्या प्रोजेक्ट मध्ये भाग घेतलेल्या आणि घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रोजेक्ट कन्व्हेनर माधवी कुलकर्णी नी केलं.
Special thanks to Rtn Ashish Jog for creating the you tube link of the audio version in time for Diwali.