Celebrating September, the Literacy month

प्रौढ साक्षरता वर्ग :

अनेक वर्ष सातत्याने पोलिओ लसीकरण करून रोटरीने जगभरातून पोलिओचे उच्चाटन करण्यामध्ये मोठी कामगिरी केली. त्यानंतर अशा कुठल्या क्षेत्रामध्ये रोटरीने सहभाग घेतला असता फार मोठा बदल घडून येईल असा विचार चालू असताना लिटरसी ह्या अतिशय आवश्यक असलेल्या क्षेत्रामध्ये काम करायचे  रोटरीने ठरवले .

रोटरी इंडिया लिटरसी मिशन (RILM) ची स्थापना करून T E A C H हा साक्षरतेवर सर्वंकष काम होईल असे नियोजन केले गेले.

त्यामध्ये T म्हणजे टीचर्स ट्रेनिंग, E म्हणजे इ लर्निंग, A म्हणजे एडल्ट लिटरसी C म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंटआणि H  म्हणजे हॅपी स्कूल अशा सर्व क्षेत्रात  काम करण्यासाठी  योजना आखण्यात आली.

याबद्दल जास्त माहिती www.rotaryteach.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे सगळ्यांनी ती जरूर  बघावी.

यामध्ये Literacy Manual दिले आहे.तेही नक्की बघावे. रोटरीने खूप उत्तम प्रकारे कार्यक्रमाची आखणी केली आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत शिक्षण पोहोचावे  यासाठी हा कार्यक्रम आखला आहे.

6 वर्षांपूर्वी या कार्यक्रमाची रोटरीच्या एका सेमिनार मध्ये मला माहिती कळली आणि माझ्या लक्षात आलं हेच माझं क्षेत्र आहे. त्यातही प्रौढ साक्षरता या विषयाकडे मी आकर्षित झाले आणि त्यामध्ये काम करायचे ठरवले.

माझ्या असं लक्षात आलं की माझ्या कंपनीत काम करणाऱ्या 18 महिला निरक्षर आहेत. त्यांना साक्षर करण्याचा कार्यक्रम आम्ही घेतला कामा च्या वेळेतच रोज तासभर त्यांना आमच्याच कंपनीतल्या staaf पैकी एका महिलेने साक्षरतेचे धडे दिले. ह्या नवसाक्षर महिलांचे अनुभव ऐकून आपण हे  काम  रोटरीच्या माध्यमातून करायलाच हवे असा मी निश्चय केला. मग मी डिस्ट्रिक्ट च्या लिटरसी कमिटीमध्ये प्रौढ साक्षरता या विभागाची पाच वर्ष जबाबदारी सांभाळली. सुरुवातीला काहीच यश येत नव्हते. निरक्षर लोकांचे गट   तयार करून त्यांच्यातल्याच शिक्षित व्यक्तीला साक्षरता वर्ग चालवण्याचे शिक्षण देऊन हे वर्ग चालवायचे होते. असे गट शोधणे, त्या लोकांना  प्रौढ वयात शिक्षणाचे महत्व पटवून देणे हे मोठेच अवघड काम होते. 15  ते  20 जणांचा गट जमल्यावर मग पुढचे आव्हान. त्यांना रोज एकत्र ज मवून त्यांचा वर्ग घेण्याचे. मी   रोज साक्षरता वर्गाला जाणार, मला माझी पुस्तकं मिळणार  ही गोष्ट वर्गात येणाऱ्या महिलांना  अतिशय आनंद देणारी  असते.

खूप शोध घेतल्यानंतर श्री परेश यांच्या कडून सोमेश्वर साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगार महिलांसाठी साक्षरता वर्ग   घेता येतील असे कळले. त्यांच्या वस्तीवरच  रात्री मिणमिणत्या उजेडात  हे वर्ग भरविले. पहाटे तीन साडेतीन ला उठून स्वयंपाक पाणी आवरून ही मंडळी ऊस तोडणीला जातात. संध्याकाळी घरी आल्यावर जेवण करून सगळे आवराआवरी करून या महिला साक्षरता वर्गाला येत असत. साक्षरता वर्गांच्या निमित्ताने ऊस तोडणी कामगारांचे जगणे मला जवळून बघायला मिळाले.

प्रौढ निरक्षरांचे गट शोधता शोधता डॉक्टर अमोल वाघमारे यांच्याशी संपर्क झाला. स्टेट रिसोर्स सेंटर या सरकारी संस्थेतर्फे  अमोल प्रौढ साक्षरतेचे काम करत होते. अमोल ने धायरी परिसरात  निरक्षरांचा एक गट आपल्याला तयार करून दिला. आपल्या क्लब तर्फे धायरीतला साक्षरता वर्ग चालविण्यात आला. तो आपल्या क्लब चा पहिलं प्रौढ साक्षरता वर्ग. यामध्ये पंधरा महिला शिकल्या. लिहिण्यावाचण्या बरोबरच कायदा साक्षरता, बँकेची ओळख पोस्टा ची ओळख, आरोग्य बद्दलची माहिती अशा अनेक गोष्टी साक्षरता वर्गात आपण शिकवितो. अमोल  मुळेच आपल्याला भीमाशंकर परिसरातील प्रोड निरक्षरांची गट मिळाले. चार वर्षांमध्ये आपण सुमारे सहाशे महिलांना साक्षर केले. अजूनही रोटरीच्या माध्यमातून साक्षरता वर्ग सुरू आहेत. 

By PP Rtn Anjali Sahsrabuddhe

Rotary Club of Pune Metro Logo

Rotarian Surekha Deshpande

President 2023-24

(M) 9823019069
Email: president.rcpm@gmail.com

 

Rotarian Prerana Joshi

Secretary 2023-24

(M) 9158998136
Email: prerana.joshi@gmail.com