गाडेकरवाडी व राजेवाडी येथे प्रौढ साक्षरता वर्ग सुरु
रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो चॅररटेिल ट्रस्ट आणि आदिम संस्कृती, अभ्यास संशोधन व मानव विकास सांस्थेचा संयुक्त उपक्रम
घोडेगाव : राजेवाडी, गाडेकरवाडी (गोहे खुर्द) येथे प्रौढ साक्षरता वर्ग सुरु करण्यात आले . आदिम संस्कृती, अभ्यास संशोधन व मानव विकास सांस्थेच्य वतीने मागील १० वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ४० गावामध्ये साक्षरता वर्ग राबवले आहेत.
या वर्षी आंबेगाव तालुक्यातील गोहे खुर्द येथील गाडेकरवाडी, राजेवाडी, व साबळेवाडी येथे प्रौढ साक्षरता वर्ग सुरु करण्यात आले आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो चारीटेबलें ट्रस्ट यांनी या साठी आर्थिक सहकार्य केले आहे.
या वर्गात ५० महिलांना लेखन, वाचन, अंकगणित, आर्थिक साक्षरता, आर्योग्या साक्षरता, कायदेविषयक माहिती इत्यादी बाबींचे शिक्षण दिले जाणार आहे.
राजेवाडी येथी वर्गात शारदा म्हसळे, साबळेवाडी येथील वर्गात मंद गभाले व गाडेकरवाडी येथील वर्गात महेश गाडेकर हे स्वयंसेवी म्हणून शिकवायचे काम करणार आहेत.