रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो तर्फे आंबेगाव च्या पश्चिम भागात कोरोनाची जनजागृती
- आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी बहुल भागांतील ३२ गावांमधून कोरोना या रोगाविषयी माहिती सांगून जनजागृती करण्यात आली.
- रोटरी क्लब मेट्रो,पुणे यांच्या सहकार्याने व आदिम संस्कृती अभ्यास,संशोधन व मानव विकास केंद्र पुणे, शहीद राजगुरू ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय यांच्या स्थानिक संयोजनातून आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील आहुपे खोरे,पाटण खोरे व भीमाशंकर खोरे यातील ३२ गावातून दि.२९ ते ३० ऑगस्ट,२०२० या दोन दिवसांत रुग्णवाहिकेद्वारे गावागावांत जाऊन माहीती पत्रके व मेगा माईकच्या साहाय्याने माहिती सांगण्यात आली. यावेळी माहिती पत्रकातून कोरोना विषयीची माहिती सांगण्यात आली आहे.योग्य ती काळजी घेण्यास सांगण्यात आले.तसेच प्रशासन कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी जे उपाय योजत आहे त्यास सहकार्य करण्यास सांगण्यात आले.
- या जनजागृती अभियानात रोहिदास गभाले, महेश गाडेकर, अमोल गिरंगे, समीर गारे यांनी सहभाग घेऊन ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.