रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो तर्फे अल्पउत्पन्नधारकांसाठी मोफत कोव्हिड लसीकरण.
दि २२ सप्टेंबर रोजी, गांधीनगर- जयप्रकाशनगर, पुणे ६ येथे अल्प उत्पन्नधारकांसाठी मोफत कोव्हिड लसीकरण केंद्राचे उद्घाटन झाले.
आदरणीय कर्णे गुरुजी, रो. उदय कर्णे यांच्या योगे रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो “वज्रनिर्धार” या महत्त्वपूर्ण लसीकरण योजनेत सहभागी झालेला आहे. या वस्ती व आजूबाजूच्या अल्पउत्पन्न गटातील नागरिकांना या मोफत लसीकरणाचा लाभ मिळणार आहे.
22-24-26 ला ३९५ जणांचे लसीकरण मेट्रो तर्फे झाले असून २,००० चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हा प्रकल्प सुराज्य सर्वांगीण प्रकल्प, गांधीनगरचा राजा सार्वजनिक ट्रस्ट व रोटरी पुणे मेट्रो तर्फे या भागात राबविला जाईल. या प्रसंगी श्री. कर्णेगुरुजी, प्रेसिडेंट स्नेहा सुभेदार, रो. पीपी माधव तिळगुळकर, रो. नयना जोशी, रो. उदय कर्णे तसेच उदय सुभेदार हजर होते.
या प्रकल्पाची योजना प्रोजेक्ट डायरेक्टर रो. पीपी मुकुंद चिपळूणकर आणि रो. उदय कर्णे यांनी प्रत्यक्षात आणली.