RCPM Picnic
रोटरी म्हणजे मैत्री आणि समाजकार्य याचा सुंदर मिलाफ! रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोची 18 सप्टेंबर ला गेलेली पावसाळी सहल हे यातला मैत्री वृद्धिंगत करण्याचा एक भाग..
साधारण 30/32 जण ठरवलेल्या बसने सकाळी साडेसात ला निघालो.पाऊस नसला तरी हवामान पावसाळी असल्याने वाटेत गरमागरम पॅटिस आणि चहा मस्त वाटला. बसमधे अंताक्षरीची धमाल होती त्यामुळे वाईचे रिसॉर्ट कधी आले कळलच नाही.
अमोघ रेसिडेन्सी मधे गरम नाश्ता तयार होताच. त्यानंतर लगेचच थोडा वेळ झुंबा आणि मग नंतर गरबा शिकण्यासाठी सर्व जण सज्ज झाले.
गरब्याच्या ठेक्यावर नव्या steps शिकायला फारच मजा आली.
ॲनेट अनन्या व रो. अमिता व रो. प्रेरणा यांनी गायलेली उत्तम गाणी व नव्यानेच परिवारात सामील झालेले पंचवाघ यांनी सांगितलेल्या गमतीजमती यात सर्वजण रंगून गेले.
भाकरी पिठलं भरली वांगी अशा चविष्ट भोजनानंतर आम्ही बलकवडे धरण बघायला गेलो. तिथे काठोकाठ भरलेले धरण, धरणाची दारे उघडल्याने वाहणारे पांढरे शुभ्र पाण्याचे प्रपात व त्यावर तोलून उभे असलेले इंद्रधनुष्य यांनी या ट्रीप ची मजा द्विगुणित केली.
रो. योगेश्री फडके