अखिलम मधुरम — मधुरा दातार
मधुरा दातारशी सुरेल गप्पांची बहारदार मैफिल रंगवली मधुरा अत्रेने…..
रोटरी क्लब आॅफ पुणे मेट्रोच्या झुम मिटींगला सुरेल गायिका मधुरा दातार सतरा तारखेला येणार आणि आपल्याशी गप्पा मारणार म्हणुन या मीटिंगची आपण सगळेजण आतुरतेने वाट पहात होतो. आणि ती आली आपल्या मनमोहक आणि मोकळ्या हसण्याने सगळ्यांचे मन जिंकून घेतले. तिचे डोळे इतके बोलके आहेत की ती हसते पण डोळ्यातून असे वाटत होते
हो आणि मधुरा दातार प्रत्यक्ष आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित राहिली तिच्या येण्याने आणि गप्पांनी वातावरण छान मोकळे झाले तिने पण कुठलाही आडपडदा न ठेवता तिला आलेले अनुभव कौतुक आणि आशीर्वाद याविषयी सांगितले तिने आशाताईंची गाणी गायली किती तरी विविध प्रकार गाण्यात असतात याचे प्रात्यक्षिक करून गाऊन दाखवले फक्त आशाताईंची नाही तर इतर गायिकांविषयी पण ती बोलली, छान आणि सुरेल गाऊन दाखविले ती इतकी भरभरून बोलत होती आणि आम्ही सगळेच तिचे गाणे ऐकण्यात दंग झालो होतो. खूपच साधी आणि सरळ गोड स्वभावाची मधुरा दातार हिने सगळ्यांचीच मनें जिंकून घेतली.
तिने परत एकदा येण्याचे कबूल केले आहे माझी खात्री आहे की ती नक्की येईल आणि अजून आपल्याशी गप्पा मारेल. मधुरा अत्रेने तिच्याशी उत्तम संवाद साधत तिला बोलते केले.
नरेंद्र द्रविड यांनी ओळख करून दिली व वासंती बेडेकर ने आभार प्रदर्शन केले.
— ऍन कविता द्रविड