आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रथित यश सर्जन आणि त्याच बरोबर 40 वर्षे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असे वक्ते डॅा.रविन थत्ते 21जुलैच्या meeting ला आपल्याला लाभले. त्यांनी ज्ञानेश्वरीतील विज्ञान अतिशय सोप्या ओघवत्या भाषेत समजावून सांगितले.
- सुरूवातच ज्ञानेश्वरीतील विज्ञानाच्या व्याखेने केली.आत्मरूपा शब्दापासून सुरूवात करून ‘मी ‘म्हणजे काय?ब्रह्म म्हणजे नेमके काय?ब्रह्म त्यातून ओंकार मग आकाश वायु अग्नी जल तारे ग्रह थोडक्यात पंचमहाभूते,विश्वाची निर्मिती कशी झाली हे समजावून सांगितले.
- वर्तन,परिवर्तन,उत्परिवर्तन ह्यातून सजीव त्याची कर्मेंद्रिये ,ज्ञानेंद्रिये ,मन, बुध्दी,चित्त ह्या गोष्टी step by step एकातून दुसर कस उत्पन्न झालं हे सोप्या पध्दतीने विशद केल.
- आपण हे सर्व विज्ञानातून शिकलो पण ज्ञानेश्वरांनी 700 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीत ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे हे त्यांनी स्पष्ट केले.सुख,दुःख,द्वेष या तीन महत्त्वाच्या भावना.या भावनांकडे कुठल्या दृष्टीने बघितले म्हणजे आपण त्याच्या आहारी न जाता आपले मनस्वास्थ उत्तम राखू शकतो हे समजावून सांगितले.
- ज्ञानेश्वरी हा धार्मिक,अध्यात्मिक ग्रंथ असा काहीसा जनमानसांत समज पण डॅा.रविनजींनी ज्ञानेश्वरी बद्दलचा नविन वैज्ञानिक दृष्टीकोन आपल्याला दिला.
- डॅा.रविन थत्ते यांची ओळख रो.दिपक बोधनींनी करून दिली.अॅन शुभदा जोशींनी आभार मानले.तांत्रिक बाजू रो.एरंडे यांनी समर्थ पणे सांभाळली.