Dene Samajyache

Dene Samajyache a platform for NGOs by Veena Gokhale

 

  • गुरूवार दि. 28 जुलै रोजी आर्टिस्ट्री संस्थेच्या वीणा गोखल्यांची मुलाखत प्राची गुर्जरांनी घेतली आणि वीणाताईंच्या कार्याची ओळख झाली.
  • खेड्यापाड्यातील,दुर्गम भागातील समाजसेवी संस्थांचा मेळावा वीणाताई आयोजित करतात.गेली 20/22 वर्षे सातत्याने उत्तमरित्या हा उपक्रम राबविला जात आहे.समाजाला समाजसेवी संस्थांची माहिती व्हावी आणि संस्थाना मदत मिळाली हा मुख्य हेतु.मेळाव्यात विनामुल्य स्टॅाल उपलब्ध करून दिला जातो.राहाण्याची व्यवस्था केली जाते.महत्त्वाचे म्हणजे पित्रृपंधरवड्यात मेळाव्याचे आयोजन केले जाते.
  • पुण्याबाहेरही मेळाव्याचे आयोजन केले जाते.अनेक गरजू संस्थाना ह्याद्वारे मदत मिळाली आहे.
  • या माध्यमातून समाजात ऋण फेडावे आणि देण्याचा संस्कार जनमानसात रूजावा असे वीणाताईंना वाटते.त्याचबरोबर कवितावाचन,अभिवाचन ह्यासारखे छंदही जोपासतात.
  • फर्स्ट लेडी माधवीने वीणाताईंची ओळख करून दिली व रो.शिरीष लवाटेंनी आभार मानले.

                                        अॅन शुभदा जोशी.

Rotary Club of Pune Metro Logo

Rotarian Surekha Deshpande

President 2023-24

(M) 9823019069
Email: president.rcpm@gmail.com

 

Rotarian Prerana Joshi

Secretary 2023-24

(M) 9158998136
Email: prerana.joshi@gmail.com