दिनांक 5 जुलाई रोजी R C पुणे मेट्रो ने आपल्या नवीन रोटरी वर्षाची सुरवात एका सुरेल कार्यक्रमाने केली.
“सुसंवादिनी..हार्मोनियम विश्वाची रंजक सफर”
प्रथितयश हार्मोनियम वादक श्री आदित्य ओक यांच्याशी श्री मंदार फडके यांनी संवाद साधला. ह्या कार्यक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की आदित्य जी ठाणे इथे, मंदार जी ह्युस्टन अमेरिका येथे, आणि बहुतेक सर्व श्रोते पुणे येथे असा अगदी ग्लोबल म्हणावा असा कार्यक्रम zoom मीटिंग मुळे घेता आला!!!!
या कार्यक्रमात आदित्यजींनी दिलखुलास गप्पा मारल्या. हार्मोनियम काय करु शकते ह्याचं उत्कृष्ट उदाहरण ऐकायला मिळालं. एक प्रत्यक्ष वादन आणि दुसरं त्यांनी दिलेलं उदाहरण… त्यांनी हार्मोनियंम ची तुलना यमन रागाशी केली. रागदारी असू देत नाहीतर भजन, कव्वाली, गझल, चित्रपट गीत..दोन्हीत काहीही तितकच साजून दिसतं. आणि हा अनुभव त्यांनी वाजवलेल्या सोहोनी, नाट्यपद, गझल, सुगम मेडले सगळ्यातूनच आला.
आदित्यजीं चे अनेक नवे पैलू कळले..त्यांचा उर्दू भाषा आणि गझल यांचा अभ्यास, उत्कृष्ट sound recordist म्हणून असलेली ख्याती, जींगल्स च्या दुनियेत त्याचं स्थान..
एका अतिशय talented कलाकाराला ऐकण्याची संधी मिळाली आणि सगळे रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
श्री मंदार फडके यांनी संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुसूत्र रित्या बांधून घेतला त्यामुळे आदित्यजीँच्या सगळ्या पैलूंशी तोंड ओळख तरी झाली. नाहीतर अशी माणसं एक दीड तासाच्या कार्यक्रमात बांधणं अशक्यच!!!
श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाना मोकळेपणाने उत्तरं दिली.
जवळजवळ 64 zoom connections वर हा कार्यक्रम पाहिला गेला.
दोन्ही पाहुण्यांचा परिचय रो. आशिष जोग यांनी करुन दिला. रो. शुभदा जोगळेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
नवीन रोटरी वर्षा ची धमाकेदार सुरुवात करण्याची R C पुणे मैट्रो ची परंपरा ह्याही वर्षी तशीच कायम रहिली!!!!
– माधवी कुलकर्णी