Bhondla
RCPM members and Anns celebrated Navratri with traditional “Bhondla”. Rtn.PP Seema Deshpande writes about the experience.
” भोंडला ” …..आपल्या सगळ्यांना ४०–५० वर्षांनी लहान करणारा शब्द ! नुसता शब्द नाही तर अनेक सुखद आठवणींचे रिळ उलगडणारा खजिनाच .
भोंडला म्हणल की आठवते आजी ने कौतुकाने पाटावर काढलेला गजराज , आईने केलेली ओळखायला जरा कठीणच पण चविष्ट खिरापत , मत्रिणीना आमंत्रण, बुचाच्या फुलांचा दरवळणारा सुगंध व जसे काही त्यावर तरंगत रिगण करून , सख्यांचे हात हातात घेऊन धरलेला फेर. पिढ्ान्पिढ्या तीच गाणी , संदर्भ बदलले तरी त्याचा आनंद तोच , गोडवा तोच !
आज अगदी अशीच एक सुखद संध्याकाळ आम्ही सगळ्यांनी अनुभली . खूपच सुंदर,अगदी मनाच्या मखरात कस्तुरी सारखा सुगंध देणारी , हेवा वाटावा असा ठेवाच तो .
भोंडल्याची कल्पना पदमाची , माधवी नी उचलून धरली आणि मंजू नी प्रत्यक्षात आणली. सर्व व्यवस्था उत्तम ….. मधोमध रांगोळी काढलेल्या चौरंगा वर माधवीचा गजराज जणू आमची वाटच बघत होता , मंजू ने आगत्याने केलेली सर्व तयारी. खानपान तर काय विचारता … पाणीपुरी , भेळ, रगडा पॅटीस , ती पण कल्याण भेळची! आणि मनसोक्त चोपल्या नंतर असिडीटी होऊ नये म्हणून आईस्क्रीम सुद्धा … त्याच बरोबरीने अनेकींनी आणलेल्या चवीष्ट खिरापत . आणि काय हवे ?
काय मेमरी आहे अश्विनी , वासंती , नीलिमा , नेहा आणि सगळ्यांचीच , अगदी सगळी गाणी म्हणली भोंडल्याची . नंतर भरपूर गप्पा आणि मनसोक्त पोटपूजा तीही मैत्रिणी समवेत. सोबतीला बूचाच्या फुलांचा दरवळणारा सुगंध पण होता बरं का !
आणि म्हणूनच मंजू आणि माधवी आमच्या सगळ्यां कडून तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद !!
– रो. पीपी सीमा देशपांडे