रोटरी क्लब आॉफ पुणे मेट्रो च्या आठवाडीक सभेमधे ‘गप्पा मायलेकींशी’ कार्यक्रमात विजया आणि निशिगंधा वाड यांची माधवी मेहंदळेने मुलाखत घेतली.
ही मुलाखत विजयाताईंच्या प्राजक्ता आणि निशिगंधा नावाप्रमाणे अत्यंत सुगंधी झाली.
स्नेहलतानी करून दिलेली अत्यंत स्नेहपूर्ण शब्द वेचून करून दिलेली या दोघींची ओळख यावरूनच कार्यक्रमाची सुरवातच एका वेगळ्या उंची वर झाली. माधवी ने अत्यंत मोजक्या प्रश्नातच दोघींना अगदी मोकळ्या वातावरणात आणले आणि मुलाखतीची औपचारिकता संपून मोकळ्या गप्पा कधी सुरू झाल्या कळलेच नाही.
काही मला आवडलेली वाक्ये:
- पालकांनी सर्कस च्या ट्रपिझ ची जाळी व्हावे आणि मुलांना स्वातंत्र्य आणि संस्कार देऊन उडू द्यावे. त्यांच्या आवडीप्रमाणे मुलांना फुलू द्यात.
- मार्कस च्या रेस मध्ये घोडे होऊ देऊ नका. त्याने देश तयार होत नाही.
- मातृभाषेतून शिक्षण महत्वाचे आहे. माय मराठी आहे आणि इंग्रजी मावशी आहे.
प्रेसिडेंट मकरंदने नेहमीप्रमाणे घेतलेला आठवड्याचा आढावा पारदर्शी आणि महितीपूर्ण होता.
पब्लिक इमेज डायरेक्टर रो. वर्षा ने दोन महिन्यात खूपच काम केले आहे. मेट्रो ने कोरोनाचे काळात इ- क्लब रनिंग कसे छान होऊ शकते याचा एक धडाच डिस्ट्रिक्ट पुढे ठेवला आहे. You tube, face book, instagram अशा सर्व माध्यमाचा उपयोग करून खूप छान public image तयार करण्याचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. Kudos to Varsha. फर्स्ट लेडी योगेश्री ने खूप च सुंदर आभारप्रदर्शन केले. सभासदांनी समयोचित प्रश्न विचारले आणि दोघीनी छान आणि समर्पक उत्तरे दिली.