Report by Ann Shubhada Joshi
12th August 2023
आयुष्यात स्पर्श फार महत्वाचा आहे. तान्हेपणी आईच्या मायेच्या स्पर्शाने बाळ लगेच शांत होते. उष्ण, गरम, गार, खरखरीत हेसगळे ज्ञान स्पर्शाने होते. काही स्पर्श चांगलेअसतात तर काही नकोसे वाटणारे असतात. दिव्यांग (अंध) लोकांना तर स्पर्श खूपच महत्वाचा. डोळ्यांची उणीव स्पर्शाने थोड्याश्या प्रमाणात भरून काढायचा प्रयत्न ते करत असतात.
म्हणूनच स्पर्शवेध मधे आपण Bad touch – Good touch यांवर रो. वृंदा वाळींबेयांचे lecture अंध मुलींची शाळा, गांधीभवन, कोथरूड येथे दिनांक 12 ॲागस्ट शनिवार रोजी दूपारी 1.30 ते 4 या वेळेत आयोजित केले होते. रो. वृंदाने अगदी ओघवत्या भाषेत मुलींशी संवाद साधत, काही activities मधून हा अवघड विषय सोपा करून सांगितला. एकूण 54 अंध मुली यात सहभागी होत्या. प्रेसिडेंट सुरेखा तर्फे मुलींना बिस्किटाचे पुडे खाऊ म्हणून देण्यात आले.