Inauguration of Sawarli Udyog Kendra

आजचा सावर्लीचा उद्योग केंद्राचे लोक समर्पण सोहळाआणि रानभाज्या महोत्सव अतिशय उत्साहात पार पडला. आपल्या क्लब चेह्याभागात वर्ष दर वर्ष चाललेले काम आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात घडून येत असलेला बदल जवळून अनुभवायची संधी मिळाली. आपल्या क्लबच्या सहयोगाने बांधलेलेबंधारे, पाण्याच्या टाक्या, खणलेले चर, मोठी झालेली झाडेआणि एकंदर काम लाजवाब! पाणी डोक्यावरून वाहून आणण्याचे कष्ट थांबल्यामुळे महिलांच्या जीवनात घडून आलेला बदल, शेतीसाठी पावसाळ्या नंतर ही पाणी उपलब्ध असल्या मुळे झालेली सोय, उद्योग केंद्राच्या सोयीमुळे उत्साहित तरुण वर्ग व महिला, हातसडीचा तांदूळ बनवायचे मशीन सुरू झाल्यामुळे आनंदित झालेले शेतकरी आणि एकंदरीतच गावकऱ्यांची सकारात्मक मानसिकता बघून खुप संतोष वाटला. आपल्या क्लब मधील सदस्य, प्रेसिडेंट, पास्ट प्रेसिडेंटस्, सुनील – अनघा, मकरंद – योगेश्री, दत्ता-कविता आणि सर्व सहभागी जनांचे खूप खूप अभिनंदन! त्यांच्या long टर्म नियोजन, कार्यकुशलता आणि consistent efforts मुळेच एव्हढे मोठेआणि बदल घडवून आणणारे कार्य उभे राहू शकले. RCP Metro चेसदस्य असल्याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो. आजच्या कार्यक्रमाला प्रेसिडेंट सुरेखा, मकरंद – योगेश्री, सुनील, कीर्ती- माधवी, मंजिरी, माधवी M, रेश्मा- प्रसाद, कृष्णा- मेघा, कर्नल साठे, रोहित, वरद – नुपूर (दत्ता- कविता ह्यांचेमुलगा व सून) उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन गावकऱ्यांनी अतिशय नीटनेटके आणि उत्साहाने केले होते. सुग्रास जेवण आणि विशेषतः रानभाज्यांच्या चवी अप्रतिम. औषधी झाडांच्या विविध उपयोगांची माहिती आणि नमुने खूप ज्ञानप्रद आणि विविध रानभाज्यांचे प्रदर्शन अतिशय महितीप्रद. निसर्ग वैविध्याने नटलेला अप्रतिम परिसर, जागो जागी फुललेली कारवी, गवत फुले, तेरडा.. आणि रोटरीतील मित्र मैत्रिणीनं सोबत दिवसभराची धमाल. प्रोजेक्ट visit, friendship, fellowship – खुपमजाआली.
Rtn. Varsha Dawale

Rotary Club of Pune Metro Logo

Rotarian Surekha Deshpande

President 2023-24

(M) 9823019069
Email: president.rcpm@gmail.com

 

Rotarian Prerana Joshi

Secretary 2023-24

(M) 9158998136
Email: prerana.joshi@gmail.com