Know your Forts by Omkar Oak
आपण सगळेजण गडांवर किल्यावर कधीनाकधी गेलो आहोत.तिथे थोडीफार माहिती कळते.आपणही फार फंदात पडत नाही.
पण अशीही काही तरूण मंडळी आहेत जी आपली नोकरी,व्यवसाय सांभाळून गडांचा,दूर्गांचा अभ्यास करतात.गुरूवार दि.4/8/22 आपल्याकडे असाच एक दूर्गप्रेमी आला होता..ओंकार ओक.
त्याने दूर्ग,गड,त्यांचेप्रकार,बुरूज,त्याची बांधणी,संरक्षक तटबंदी,दुर्ग बांधतानाचा विचार हे सर्व अतिशय ओघवत्या भाषेत सांगितले.त्याचबरोबर तिथली भूयार,जाण्या येण्याचे मार्ग कसे आहेत,शत्रुला पटकन न दिसणारे गडांचे प्रवेशद्वार ह्याचे सुंदर power point presentation पण केले.दूर्गांवर घडलेल्या काही रंजक घटनाही सांगितल्या.
ओंकार रेस्क्यु टीम बरोबर coordinator म्हणूनीही काम करतो.विशेषतः तरूणमंडळी फारशी काळजी न घेता गडावर जातात.उत्साहाच्या भरात गडाला हानी पोचली जाते आणि स्वतः च्या जीवही धोक्यात येतो.या बद्दल खंत व्यक्त केली.
रो.दिपक बोधनींने ओंकार ओकची ओळख करून दिली व रो.देवचक्के यांनी आभार मानले.
अॅन शुभदा जोशी